nagpurruralNews

बाबा ताजुद्दीन याचा 76 वा सहा दिवसीय ऊर्स.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हस्ते तसेच आमदार सुनीलबाबू केदार यांच्या प्रमुख उपस्थिती होणार सर्वधर्म समभाव ऊर्सा ला शुरुवात कुराणी,सलामी,कीर्तन,भजन व आरती होणारे एकमेव स्थान दररोज उसळणार लाखो भाविकांची अलोट गर्दी.सहा दिवसीय आयोजना करीता प्रशासन व ग्रामवासी सज्ज.

21Views

वाकी:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे

सावनेर तालुक्यातील वाकी या गावात १९०८ ला सुफी संत बाबा ताजुद्दीन औलिया यांचे पाऊल पडताच हे क्षेत्र तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखल्या जाऊ लागले तात्कालीन काशीनाथ पाटील डहाके हे माल गुजार असल्यानें त्याची भेट बाबा ताजुद्दीन याच्याशी झाली व ते बाबाच्या सानिध्यात राहून सर्व धर्म समभावाची जोपासना करू लागले त्यांनी आपल्या राहत्या वाड्यातच ताजुद्दीन बाबा यांचा वास्तव्य करण्याची प्रार्थना केली असता बाबा नी ती सहर्ष स्वीकारून त्याच वाड्याचा दुसऱ्या माळ्यावर जवळपास 3 वर्ष तप केला हळूहळू बाबा द्वारे केल्या जाणाऱ्या चमत्कारची ख्याति पंच क्रोशीत पसरू लागल्याने भाविकांची गर्दी उसळू लागल्याने वाड्यातील व्यवस्था प्रभावीत होऊ लागल्यामुळे बाबानी स्वतःहा काशी नाथ पाटील यांचा मालकी हक्काच्या शेतात असलेल्या चिंचेचा झाडाखाली आपले वास्तव्यास सुरुवात करून जँगल रानातच राहण्याचा विचार सोडला असता तेथेच बाबाच्या चेहेतें व सेवाधाऱ्यानी तणसांची कुटी उभारली त्याच ठिकाणी आज बनवलेली प्रशस्त इमारत म्हणजे बाबा ताजुद्दीन यांचा वाकी दर्गा होय..
बाबा ताजुद्दीन यांनी अनेक चमत्कार केल्याची आखीका आहे त्यात त्या वेळेला महामारी सारखा पसरणारा प्लेग,कॉलरा, हैंजा सारख्या जीव घेण्या आजारांवर बाबाच्या दवाखान्यातील मातीनेच उपचार झाला असल्याची तर त्यांत मातीने प्राणिमात्रांच्या मृतदेह मध्ये जीव टाकल्याची माहिती आहे; बाबाच्या या दवाखान्याचे प्रसिद्दि संपूर्ण विशवभर असून येथील माती अमेरिके पर्यंत च्या भाविकांना आपल्याकडे आकर्षीत करते तर कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांचे हजारोच्या वर रुग्ण बरे झाल्याचे कळते….
बाबाच्या सामोर कोणीही छोटे मोठे नसून सर्वांना न्याय देण्या करिता बाबाचा हायकोर्ट सुद्धा असल्याचे निदर्शनास येते तिथे केलेली फिरीयाद कधीही वाया जात नसल्याचे खात्री लायक उत्त आहे..सहावी पिढी डहाके परिवाराची जपत आहे काशिनाथ पाटलांचा वारसा.
१९०८ पासून सुरू झालेली परंपरा आज ही निरंतर पणे डहाके कुटुंबाचा सहावी पिढी जप्त असून बाबा ताजुद्दीन दर्गा वाकी चे अध्यक्ष प्रभाकर डहाके,सचिव ज्ञानेश्वर डहाके,विषवस्त मधुकर टेकाडे व सहकारी सदर आयोजनाचे जोपासना करत असून संपूर्ण देश विदेशातुन येणाऱ्या बाबा ताजुद्दीन च्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोई, सुविधा उपलब्ध करून देण्यास सदैव तत्पुर असतात…..
दि०३ मार्च ला ताजबाग नागपूर येथून बाबा ताजुद्दीन शाही संदल काशिनाथ डहाके यांच्या वाड्यात असलेल्या मूळ स्थानावर पोहचून काशीनाथ पाटील यांच्या वाड्या वरून निघणारा संदल व ताजबाग येथून आलेल्या यांचा वाकी येथून भव्य संयुक्त मिरवणूक निघून जवळपास 3 किमी.दूर असलेल्या बाबा ताजुद्दीन यांचा वाकी दरबार येथे पोहचून सहा दिवसीय भव्य ऊर्सला सुरुवात होते…
सदर आयोजनात श्रीमंत राजे रघुजीरावभोसले(पंचम)श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ संपन्न होतो….
वाकी या मुळे ठिकाण वरून बाबा ताजुद्दीन यांना तत्कालीन भोसले राजे यांनी नागपूर ला नेण्याचे व त्या वेळेला भोसले कालीन सक्करदरा येथील किल्ल्यात त्यांची स्थान असलेल्या तसेच तेथूनच नजीक असलेल्या ताजबाग येथे बाबांची समाधी आहे.विश्वप्रसिद्ध या सुफी संताला स्टार एपेक्स न्यूज तर्फे सादर प्रणाम…..बाबाची विशिष्ट पूर्ण व सर्व धर्म सम भावाचे धोरण प्रत्येक नागरीकांना पर्यंत पोहचावे हेच आमचे प्रयत्न…
१९४४ पासुन काशिनाथ पाटील यांचे चिरंजीव महादेव राव पाटील यांनी सुफी संत शफी बाबा यांच्या पुढाकाराने उर्सची परंपरा सुरू केली आजही डहाके कुटुंबीय बाबांच्या सेवेत आहे. तयारी अंतिम टप्प्यात असून ३मार्चला उर्स सुरू होत आहे तरी जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ घ्यावा.
वाकी का पाणी,वाकी की हवा,बाबाकी की कृपा, मिटी भी दवा

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply