News

‘बिग बॉस’फेम आर्शी खानही काँग्रेसमध्ये.

36Views

मुंबई:

छोट्या पडद्यावरील ‘भाभी4 जी’ ऊर्फ शिल्पा शिंदे हिच्यानंतर आता ‘बिग बॉस’ फेम आर्शी खान हिनंही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आर्शीला महाराष्ट्र काँग्रेसचं उपाध्यक्षपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईत २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या एका कार्यक्रमात आर्शीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशासाठी काम करण्याची इच्छा असल्यानं मी राजकारण प्रवेशाचा निर्णय घेतल्याचं तिनं टाइम्सऑफइंडिया.कॉमशी बोलताना सांगितलं.

आर्शी खान ही ‘बिग बॉस’च्या अकराव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिथूनच तिला लोकप्रियता मिळाली. बिग बॉसमध्ये येण्याआधी ती वादग्रस्त वक्तव्य व सोशल मीडियावरील हॉट व्हिडिओंमुळं चर्चेत असायची. पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी याच्या मुलाची आई झाल्याचंही तिनं जाहीर केलं होतं. त्यामुळंही तिच्या नावाची बरीच चर्चा झाली होती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply