News

‘भाजपकडून राजकारण पुलवामा हल्ल्याचे’

29Views

नवी दिल्ली :-

पुलवामातील येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना केंद्रातील सत्ताधारी भाजप-रालोआविरोधी २१ राजकीय पक्षांनी संयुक्त निवेदनाद्वारे पाकिस्तानविरुद्ध भारतीय हवाईदलाने केलेल्या सडेतोड कारवाईची तसेच तिन्ही सैन्यदलाचे मुक्तकंठाने प्रशंसा केली. पुलवामाच्या हल्ल्यानंतर भाजपकडून पुलवामाच्या जवानांच्या हौतात्म्याचे केले जाणारे राजकारण हा गंभीर चिंतेचा विषय असल्याची टीका २१ पक्षांच्या नेत्यांनी केली आहे.

ही बैठक पाकिस्तानातील दहशतवादी शिबिरांविरुद्ध भारताने केलेल्या कारवाईपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी ऐक्याला दृढ करण्यासाठी बोलविण्यात आली होती. पण सीमेवर भारत-पाक तणाव चिघळल्यानंतर या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेवरच चर्चा करण्यात आली. या बैठकीत आधी सामील न होणारे डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी आणि सुधाकर रेड्डींनीही भाग घेतला. राष्ट्रीय सुरक्षेचे स्थान पक्षांच्या राजकीय स्वार्थाच्या वर असून त्यात राजकीय लक्ष्याच्या इच्छापूर्तीला कोणतेही स्थान नाही, अशी भावना या संयुक्त निवेदनात करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक न बोलविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्यवहार निराशाजनक असल्याची टीका करताना विद्यमान सुरक्षा परिस्थितीवर आजच्या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करताना पाकिस्तानच्या दुःसाहसाचा धिक्कार केला. भारताची सार्वभौमत्व आणि ऐक्याच्या रक्षणासाठी उचलल्या जाणाऱ्या प्रत्येक पावलावर विरोधी पक्षांना विश्वासात घेण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply