News

भाजपाला पराभव दिसू लागला – विखे पाटील

10Views

चंद्रपूर :-

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी एक वर्षाअगोदर भाजपा मित्रपक्ष साडेतीनशेच्या पुढे लोकसभेच्या जागा जिंकेल असे ठणकावून सांगितले होते. मात्र निवडणुकीला आता तीन महिने उरले असताना ही निवडणूक अटीतटीची होईल अशा भाषा बोलत आहे. त्यामुळे भाजपाला स्वत:चा पराभव दिसू लागल्याची बोचरी टीका विधान परिषदचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेदरम्यान चिमूर येथील न्यु प्रेरणा कॉन्व्हेंट येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. विखे पाटील पुढे म्हणाले की, शेतमालाला हमी भाव देण्याचे आश्वासन भाजपाने दिले. मात्र प्रत्यक्षात जुमलेबाजी होताना नागरिकांना दिसत आहे. सर्वसामान्य नागरिक हतबल असून सत्ताबदलाचे वारे देशात सुरू झाले आहे. भविष्यातील निवडणूका पाहता काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून जोमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उपगटनेता काँग्रेस विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमेटी सचिव आशिष दुवा, माजी मंत्री राजेंद्र मुळक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस श्याम उमाळकर, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, माजी आमदार आशिष देशमुख, काँग्रेस चंद्रपूर जिल्हा प्रभारी किशोर गजभिये, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार अविनाश वारजूकर, माजी आमदार सेवक वाघाये, शहा आलम शेख ,शकूर नागानी, विशाल मुत्तेमवार,डॉ. एन. डी. किरसान, नितीन कोडवते, गजानन बुटके, ममता डुकरे, पंचायत समिती सभापती विद्या चौधरी, उपसभापती शांताराम शेलवटकर, संजय डोंगरे,नगराध्यक्ष गोपाल झाडे आदी उपस्थित होते. दरम्यान, श्रीहरी बालाजी मंदिरापासून बैलगाडी रॅली, बाईक रॅली, जिप्सी रोड शो, पदयात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. राम राऊत, प्रास्ताविक डॉ. सतिश वारजुकर यांनी तर आभार प्रदर्शन माधव बिरजे यांनी केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply