News

भारताने नाणेफेक जिंकली, फलंदाजीचा निर्णय.

8Views

मोहाली:-

भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यासाठी नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीत असलेल्या टीम इंडियाने या सामन्यात चार बदल केले आहेत.

टीम इंडियात झालेल्या बदलानुसार महेंद्रसिंग धोनीच्या स्थानावर ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. तर चौथ्या क्रमांवर सतत फॉर्मच्या शोधात असलेल्या अंबाती रायुडूच्या जागी के. एल. राहुल, मोहम्मद शमीच्या जागी भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजाच्या जागी युजवेंद्र चहल यांना संधी देण्यात आली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा एकदिवसीय सामना मोहाली येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाने मालिकेच्या सुरुवातीलाच सामना जिंकत आघाडी मिळवली आहे. परंतु, शुक्रवारी रांचीमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने शेवटच्या दोन सामन्यांमध्ये धोनीला विश्रांती देण्यात आली आहे.

या सामन्यात सर्वांच्या नजरा ऋषभ पंतकडे लागल्या आहेत. या सामन्याच चांगले प्रदर्शन करत ऋषभ वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल हे नक्की.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply