NewsSports

भारताने विंडीजला १०४ धावांत गुंडाळले

42Views

तिरुवअनंतपूरम :-

भारत विरुद्ध वेस्टइंडिज एकदिवसीय मालिकेतील निर्णायक आणि अखेरच्या सामन्यात भारतीय गोलदाजांनी विंडीजच्या फलंदाजांची दाणादाण उडवली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजला भारताने १०४ धावांत गुंडाळले आहे. अवघ्या ३१.५ षटकांत विंडीजचा डाव संपुष्टात आला असून भारतापुढे विजयासाठी १०५ धावाचे आव्हान आहे.

भारताकडून फिरकीपटू रविंद्र जाडेजाने ९.५ षटकांत ३४ धावा देत सर्वाधिक ४ बळी टिपले. जसप्रीत बुमराहने २, खलिल अहमदने २ तर भुवनेश्वर कुमार आणि कुलदीप यादवने प्रत्येकी एकेक गडी बाद केला.

पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी आघाडी घेतलेली आहे. मालिकेतील एक सामना ‘टाय’ झाला तर एक सामना विंडीजने जिंकला आहे. आजचा सामना भारताने जिंकल्यास कॅप्टन कोहलीच्या नावावर आणखी एक मालिकाविजय नोंदवला जाणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply