News

भारता हल्ला आम्ही परतावून लावला; पाकचा दावा.

47Views

पाकिस्तान:-

‘भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या सैन्यानं लगेच कारवाई करत त्यांना पळवून लावले,’ असा दावा पाकिस्तान सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर १२ दिवसांनी आज पहाटे साडेतीनच्या सुमारास भारतीय हवाई दलाने पाकिस्तानील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोच्या बॉम्बचा वर्षाव केला. या हल्ल्यात कमीतकमी २०० दहशतवादी मेले असल्याची माहिती आहे. हल्ल्याचं व्हिडिओ फुटेजही भारतीय हवाई दलानं प्रसिद्ध केलं आहे. मात्र, असं काही झाल्याचं पाकिस्ताननं अमान्य केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांना आम्ही लगेच परतवून लावले, असं आसिफ गफूर यांनी सांगितलं. भारतीय सैन्याची विमान एलओसी ओलांडून पाकिस्तानात आली खरी. पण सज्ज असलेल्या पाकिस्तानी हवाई दलानं त्यांच्यावर हल्ला केला. यामुळं भारतीय विमानांना माघार घ्यावी लागली. पण माघार घेताना त्यांनी मोकळ्या रानात बॉम्बचा वर्षाव केला. या बॉम्बवर्षावामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही, असं ते म्हणाले.

दरम्यान, पाकिस्तानी हवाई दलानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला होता. पण ‘मिराज २०००’ची क्षमता आणि संख्या पाहून त्यांच्या विमानांनी माघार घेतली, अशी माहिती भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी दिली आहे.

उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राइक करण्यात आली होती तेव्हाही पाकिस्तानने हा हल्ला झाल्याचं मान्य केलं नव्हतं. सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामाबादमध्ये बैठक बोलावल्याचे समजते आहे. भारत आणखी काही हल्ले करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply