News

‘भारतीयांच्या मनात जे होतं, ते झालं’

53Views

मुंबई: –

‘पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले करून भारतीय सैन्यानं आपली ताकद दाखवून दिली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात जे होतं, तेच झालं आहे,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

भारतीय हवाई दलानं पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकनंतर सैन्यावर सर्वच स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही भारतीय हवाई दलाचं व सैन्याचं अभिनंदन केलं आहे. ‘भारतीय सैन्याचा मला अभिमान वाटतो. आमच्या जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही हेच आमच्या सैन्यानं पाकिस्तानला दाखवून दिलंय,’ असं फडणवीस म्हणाले.

‘मुंबईत नेहमीच हायअलर्ट असतो. जी काळजी घ्यायची ती आम्ही घेत आहोत. सर्व यंत्रणा सतर्क आहेत,’ असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एअर स्ट्राइकच्या खंबीर निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदी यांचेही आभार मानले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply