News

भारतीय संघाची निवड फायनल?

27Views

, पुणे :-

या वर्षी मे महिन्याच्या अखेरीस इंग्लंडमध्ये वनडे वर्ल्डकपचे आयोजन होते आहे. त्याची रंगीततालीम म्हणून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्याकडे बघितले गेले. या दौऱ्यातील कामगिरीतून निवड समितीने वर्ल्डकपचा अंतिम १५ जणांचा संघ जवळपास निश्चित केला आहे. तसे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीतही स्पष्ट केले. या निमित्ताने भारतीय संघावर टाकलेला एक दृष्टिक्षेप…

१) रोहित शर्मा

वनडेतील प्रभावी सलामीवीर म्हणून रोहितकडे बघितले जाते. आक्रमक सुरुवात मिळवून देण्याची आणि एक हाती विजय मिळवून देण्याची क्षमता रोहितकडे आहे. सलामीवीर म्हणून तरी त्याचे स्थान निश्चित आहे.

२०१ वनडे, ७८०८ धावा, ४७.६० सरासरी

न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी

५ वनडे, १६९ धावा, ३३.८० सरासरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

३ वनडे, १८५ धावा, ६१.६६ सरासरी

२) शिखर धवन

रोहितच्या साथीला येणारा दुसरा सलामीवीर म्हणून धवनने स्थान निश्चित केले आहे. सध्या तरी धवनला पर्याय आपल्याकडे दिसत नाही. याला कारण म्हणजे ऐनवेळी त्याच्याऐवजी कोणी फलंदाज आणण्याची जोखीम भारतीय संघव्यवस्थापन पत्करणार नाही. न्यूझीलंडविरुद्ध वनडेत त्याने दोन अर्धशतके ठोकली.

१२३ वनडे, ५१७८ धावा, ४५.०२ सरासरी

न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी

५ वनडे, १८८ धावा, ४७.०० सरासरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

३ वनडे, ५५ धावा, १८.३३ सरासरी

३) विराट कोहली (कर्णधार)

कर्णधार म्हणून विराट कोहलीने क्षमता सिद्ध केली आहे. त्याच्या बॅटमधूनही धावांचा पाऊस पडत आहे. मागील दोन वर्ल्डकपचा अनुभव त्याच्या पाठिशी आहे. तेव्हा वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा कर्णधार तोच असेल, यात शंकाच नाही.

२२२ वनडे, १०५३३ धावा, ५९.५० सरासरी

न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी

३ वनडे, १४८ धावा, ४९.३३ सरासरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

३ वनडे, १५३ धावा, ५१ सरासरी

४) अम्बटी रायुडू

३३ वर्षीय रायुडूने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. सध्या तो चौथ्या क्रमाकांवर फलंदाजीस येत आहे. रहाणेचा संघातील चौथा क्रमांक त्याने पटकावला आहे. प्रशिक्षक रवी शास्त्रींचा त्याला पाठिंबाही आहे.

५२ वनडे, १६६१ धावा ५०.३३ सरासरी

न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी

५ वनडे १९० धावा ६३.३३ सरासरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

२ वनडे २४ धावा १२.०० सरासरी

५) महेंद्रसिंग धोनी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी माजी कर्णधार धोनीवर फॉर्मावरून टीका होत होती. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये तोच भारताचा प्रमुख यष्टीरक्षक असेल, यात शंकाच नाही. शिवाय त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला खूपच फायदा होईल.

३३८ वनडे १०४१५ धावा ५०.८० सरासरी

न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी

२ वनडे डाव ४९ धावा ४९.०० सरासरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

३ वनडे १९३ धावा १९३ सरासरी

६) केदार जाधव

सहाव्या क्रमाकांचा फलंदाज म्हणून सध्या तरी केदार जाधवकडे बघितले जात आहे. अर्थात, त्याचा हा क्रमांक निश्चित नसला तरी मागील काही सामन्यांत त्याने फलंदाजीसोबत पार्ट टाइम फिरकी गोलंदाज म्हणूनही छाप पाडली आहे. लढतीच्या परिस्थितीनुसार त्याचे संघातील स्थान निश्चित केले जाईल.

५४ वनडे १००२ धावा ४३.५६ सरासरी २५ विकेट

न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी

३ वनडे डाव ५७ धावा २८.५० सरासरी ३ विकेट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

१ वनडे ६१ धावा ६१ सरासरी

७) हार्दिक पंड्या

संघातील प्रभावी अष्टपैलू म्हणून हार्दिककडे बघितले जात आहे. गोलंदाजीपाठोपाठ गरज असेल तेव्हा आक्रमक फटकेबाजीची त्याच्यात क्षमता आहे. संघातील एकमेव अष्टपैलू म्हणून त्याचे संघातील स्थान निश्चित मानले जात आहे. शिवाय प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीचा त्याच्यावर विश्वास आहे.

४५ वनडे, ७३१ धावा २९.२४ सरासरी ४४ विकेट

न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी

२ वनडे डाव ६१ धावा ३०.५० सरासरी ४ विकेट

८) भुवनेश्वरकुमार

१०३ वनडे ११४ विकेट

न्यूझीलंड दौऱ्यातील कामगिरी

५ वनडे ७ विकेट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

३ वनडे ८ विकेट

९) महम्मद शमी

५९ वनडे १०८ विकेट

न्यूझीलंडमधील कामगिरी

४ वनडे ९ विकेट

ऑस्ट्रेलियातील कामगिरी

३ वनडे ५ विकेट

१०) जसप्रीत बुमराह

४४ वनडे ७८ विकेट

११) यजुवेंद्र चहल

४० वनडे ७१ विकेट

न्यूझीलंडमधील कामगिरी

५ वनडे ९ विकेट

ऑस्ट्रेलियामधील कामगिरी

१ वनडे ६ विकेट

यांचेही पर्याय (यातून होणार निवड)

उमेश यादव

७५ वनडे १०६ विकेट

कुलदीप यादव

३९ वनडे ७७ विकेट

ऋषभ पंत

३ वनडे ४१ धावा

दिनेश कार्तिक

९१ वनडे १७३८ धावा

रवींद्र जाडेजा

१४७ वनडे १९९० धावा १७१ विकेट

विजय शंकर

४ वनडे ४५ धावा

..

अजिंक्य रहाणे

९० वनडे २९६२ धावा

कृणाल पंड्या

९ टी-२० ६९ धावा १० विकेट

निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत आपली मते मांडली…

-)स्पिनरबाबत

वर्ल्डकपचा संघ जवळपास निश्चित आहे. केवळ एखाद-दुसऱ्या नावाचा शेवटच्या क्षणी समावेश केला जाऊ शकेल. इंग्लंडमधील खेळपट्ट्या ठणठणीच आणि चेंडूला उसळी देणाऱ्या आहेत. म्हणूनच आम्ही बोटांद्वारे चेंडू वळवणाऱ्या फिरकी गोलंदाजांऐवजी मनगटी फिरकी गोलंदाजांना स्थान दिले आहे.

-)मधल्याफळीबाबत

टीम इंडियाने इंग्लंडमध्ये मालिका गमावली तेव्हा मधल्या फळीबाबत चिंता वाटत होती. मात्र, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यानंतर ही चिंता मिटली आहे.

मधल्या फळीत आम्हाला अनुभवी फलंदाज हवा होता. चौथ्या स्थानासाठी आम्ही अनेकांना संधी दिली. त्या तुलनेत रायुडूने आयपीएल, टी-२० आणि वनडेत चांगली कामगिरी करून दाखवली.

-)शंकर आणि पंतबाबत

विजय शंकर आणि ऋषभ पंत या दोघांमध्ये क्षमता आहे. म्हणूनच त्यांना टी-२० संघात स्थान दिले होते. त्यांचा विचार केला जाईल. तीच स्थिती कृणाल पंड्याबाबत. त्याने छाप पाडली आहे.

-)संघातील अष्टपैलूंबाबत…

आपल्याकडे सध्या हार्दिक पंड्या, केदार जाधव, रवींद्र जाडेजा आणि विजय शंकर असे चार पर्याय आहेत. अर्थात, चौघांना संधी देता येणार नाही. परिस्थितीनुसार किती जणांना स्थान द्यायचे याचा विचार करता येईल.

-)धोनीच्या क्रमांकाबाबत

धोनी हा भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली. मधल्या फळीतील तो महत्त्वाचा फलंदाज ठरणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply