News

भारतीय हवाई हल्ल्यात ‘जैश’चं मोठं नुकसान; मसूदच्या भावाची कबुली.

10Views

नवी दिल्ली:-

बालाकोटमध्ये भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यातील नुकसानीचं वृत्त पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्करानं नाकारलं असलं तरी, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हवाई हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. ‘जैश’चा म्होरक्या मसूद अझहरचा लहान भाऊ मौलाना अम्मार यानं एका ऑडिओ क्लिपमधून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अम्मारची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यात ‘मर्काज’वर बॉम्ब पडल्याचं अम्मार बोलत आहे. भारतीय लढाऊ विमानांनी ‘जैश’चे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर त्यानं नाराजीही व्यक्त केली. शत्रूंनी युद्ध पुकारलं आहे, असंही तो म्हणाल्याचं ऐकायला मिळतं. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेशावरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मौलाना अम्मारनं ही कबुली दिल्याचं मानलं जात आहे. ‘भारतीय लढाऊ विमानांनी कोणत्याही एजन्सीच्या मुख्यालयाला लक्ष्य केलं नाही. त्यांनी कोणत्याही मुख्यालयावर बॉम्बहल्ला केलेला नाही. काश्मीरमधील मुस्लिमांच्या मदतीसाठी त्यांनी आमच्या केंद्रांवर हल्ला चढवला आहे,’ असंही अम्मार म्हणाला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply