News

‘भारत-पाक सामना; कोहलीविना फरक पडणार नाही’

26Views

कोलकाता :-

भारतीय क्रिकेट संघ उत्तम असून कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, असे वक्तव्य माजी कर्णधार सौरभ गांगुली याने केले आहे. आशिया कप स्पर्धेत बुधवारी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. या पूर्वी या स्पर्धेत दोन्ही संघांदरम्यान एकूण १२ सामने झाले आहेत. यात भारताने ५ तर भारताने ६ सामने जिंकलेले आहेत.

दुबईत होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाचे दावेदार असतील यात शंका नाही असेही गांगुली म्हणाला. या सामन्यात कोहली नसला तरी फारसा फरक पडेल असे आपल्याला वाटत नाही, याचे कारण म्हणजे भारतीय संघ उत्कृष्ट आहे, असे म्हणत पाकिस्तानने देखील आपल्या कामगिरीत सुधारणा केल्याची नोंदही गांगुलीने केली.

भारतीय संघ हा आशिया कप स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने हा किताब एकूण सहा वेळा पटकावला आहे, तर पाकिस्तान दोनदा चॅम्पियन बनला आहे. कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. इंग्लंड दौऱ्यानंतर कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. दोन्ही संघांची शेवटची गाठ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पडली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव केला होता.

Mehul Rahangdale
the authorMehul Rahangdale
Editor

Leave a Reply