News

भारत सोडण्याचे आदेश पाकच्या महिलेला.

46Views

 नवी दिल्ली:-

दिल्ली हायकोर्टाने गुरुवारी एका पाकिस्तानी महिलेला दोन आठवड्यांमध्ये भारत सोडण्याचे आदेश दिले आहे. सरकारने या महिलेला भारत सोडण्याची नोटीस बजावल्यानंतर तिने कोर्टात धाव घेतली होती. तथापि, कोणत्याही कायद्याच्या तत्त्वांमध्ये तिला भारतात राहण्याचा अधिकार प्राप्त होत नसल्याचे कोर्टाने सांगितले.

मूळची पाकिस्तानची असलेली ही ३७ वर्षीय महिला २००५ मध्ये भारतीय पुरुषाशी विवाह करून भारतात आली होती. तेव्हापासून ती दिल्लीमध्ये पती आणि दोन मुलांसोबत राहात आहे. तिच्याविषयी सुरक्षा संस्थांनी प्रतिकूल अहवाल दिला असून तिला बजावण्यात आलेल्या नोटिशीमध्ये काहीही अवैध नाही, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर आचार्य आणि केंद्राची बाजू मांडणारे वकील अनुराग अहलुवालिया यांनी सांगितले. त्यामुळे गृह मंत्रालयाने बजावलेल्या नोटिशीनुसार या महिलेने २२ फेब्रुवारीपर्यंत भारत सोडणे अपेक्षित होते. त्यावर ही महिला भारतात निवास करण्याचा अधिकार प्रस्थापित व्हावा, असे कोणतेही पुरावे सादर करू शकलेली नाही. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांत या महिलेने देश सोडावा, असे आदेश कोर्टाने दिले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply