News

भीमा कोरेगावाला जाण्यास परवानगीः हायकोर्ट

17Views

मुंबई :-

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना पुण्यात कार्यक्रम वा सभा घेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. असं असलं तरी भीमा कोरेगावला जाण्यास चंद्रशेखर आझाद यांना मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी चंद्रशेखर आझाद हे मुंबईहून पुण्याला पोहोचले आहे.

दोन दिवसांपूर्वी मुंबईत पोहोचलेल्या चंद्रशेखर आझाद यांना मुंबई पोलिसांनी स्थानबद्ध केले अशा आशयाच्या बातम्या पसरल्या होत्या. मुंबईहून पुण्याला गेलेले चंद्रशेखर आझाद यांना सभा घेण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उद्या १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी चंद्रशेखर आझाद हे पुण्याला गेले आहेत. २९ डिसेंबर रोजी चंद्रशेखर आझाद यांची वरळीच्या जांबोरी मैदानात सभा होणार होती. वरळी पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यानंतर आझाद यांना मुंबई पोलिसांनी हॉटेलमध्ये बंद करून ठेवले आहे, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आगामी निवडणुकीत मोदी सरकारला हे महागात पडेल. मोदी सरकारने हे युद्ध सुरू केले असून याचा अंत भीम आर्मी करणार, असा इशारा आझाद यांनी एका व्हिडिओतून दिला होता.

उत्तर प्रदेश येथील भीम आर्मीचे प्रमुख असलेले चंद्रशेखर आझाद हे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. २९ डिसेंबर रोजी वरळीतील जांबोरी मैदानात पहिली सभा, ३० डिसेंबरला पुण्यात, ३१ डिसेंबरला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात, १ जानेवारीला भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, २ जानेवारी रोजी मराठवाड्यातील लातूर या ठिकाणी सभा व त्यानंतर ४ जानेवारीला अमरावती या ठिकाणी सभा होणार होती.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply