News

भीम आर्मीची आज सभा; शेकडो कार्यकर्त्यांना अटक

23Views

मुंबई: –

भीम आर्मीच्या मुंबईत होणाऱ्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी या संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली असून ३०० ते ४०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या सभा मुंबई, महाराष्ट्रात होऊ नयेत म्हणूनच हे अटकसत्र सुरू असल्याचा आरोप आर्मीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

उत्तर भारतात सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष पुकारणारे भीम आर्मीचे नेते आझाद यांची आज वरळीतील जांबोरी मैदानात सभा होणार आहे. या सभेसाठी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र, त्याआधीच कालपासून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. दिंडोशी, वनराई, घाटकोपर, समता नगर, शिवाजी पार्क, दादर, वरळी येथील पोलिसांनी त्या-त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. रावण यांना भेटण्यासाठी गेलेले विद्रोही चळवळीतील कार्यकर्ते कॉ. सुबोध मोरे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply