News

मतदानाची तारीख रमजान महिन्यात येत असल्याने मुस्लिम नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

9Views

कोलकाता/लखनऊ 

निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा केली. लोकसभा निवडणुकांच्या तारखेवरून एक नवा वाद समोर आला आहे. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशात मतदानाची तारीख रमजान महिन्यात येत असल्याने मुस्लिम नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रमजानमध्ये येत असलेल्या तारखा बदलण्यात याव्यात अशी मागणी या नेत्यांनी केली आहे.

कोलकाताचे महापौर आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे नेते फिरहाद हाकिम यांनी या तारखेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. त्याचा आपण सर्वांनी सन्मान करायला हवा. आम्ही निवडणूक आयोगाविरोधात काहीही बोलणार नाही. परंतु, लोकसभा निवडणुका सात टप्प्यात होणार असल्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातील निवडणूक येथील लोकांसाठी त्रासदायक ठरणार आहे. तसेच, सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होणार आहे. कारण मतदान आणि रमजान एकाचवेळी आहे, असे हाकिम म्हणाले.

लोकसभा निवडणूक सात टप्प्यांत +

उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम लोक रोजा ठेवतील आणि आपला मतदानाचा अधिकारही बजावतील हे निवडणूक आयोगाने ध्यानात ठेवायला हवे होते. मुस्लिमांनी मतदान करू नये, असे भाजपला वाटत आहे. पण, आम्ही मतदान करणार आहोत. ‘भाजप हटाओ-देश बचाओ’ यासाठी देशातील लोक आता कटिबद्ध आहेत, असेही फिरहाद हाकिम म्हणाले. निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशात ६, १२ आणि १९ मे रोजी मतदान ठेवले आहे. ५ मे रोजी रमजान मुबारकचा चाँद दिसू शकतो. त्यानंतर ६ मे पासून रमजानचा महिना सुरू होऊ शकतो, या तिन्ही तारखा रमजानच्या महिन्यात येणार असल्याने मुस्लिमांना अडचणीचा सामना करावा लागणार आहे, असे लखनऊ ईदगाहचे इमाम आणि मौलाना खालिद रशीद फिरंगी महली यांनी म्हटले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply