News

मध्य प्रदेश देणार पाणी.

7Views

 नागपूर :-

मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली. या जलसंकटाचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, पाण्याचे संकट आलेच तर मध्य प्रदेश सरकार धावून येणार आहे. तसा शब्दच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलमनाथ यांनी दिला असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

बिजलीनगर येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रपरिषदेत बावनकुळे यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेशातील चौराई धरणातील पाच टक्के पाणी नागपूरसाठी सोडण्यात यावे, यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हे पाणी तोतलाडोह येथे आले तर त्याचा लाभ नागपूरकरांना मिळेल. कमलनाथ यांनी याबाबत सकारात्मक पवित्रा घेतला असून गरज पडल्यास चौराई धरणाचे पाणी नागपूरसाठी सोडण्यात येईल. यासाठी एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात मध्य प्रदेश सरकारसोबत पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

चौराई धरणामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ६१५ दशलक्ष मीटर पाणी कमी झाले आहे. पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनावर याचा परिणाम झाला आहे. पाण्याची तूट भरून काढण्यासाठी, सिंचनासंदर्भात उद्भवलेल्या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र, टंचाई निर्माण झाल्यास मध्य प्रदेश सरकार धावून येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

१३ हजार सिंचनविहिरी

मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनावर याचा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी १३ हजार सिंचनविहिरी निर्माण करण्यात येत आहेत. विभागातील पेंच लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या सिंचन विहिरीचा सर्वाधिक लाभ होणार आहे. विभागातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यासाठी दोन टप्प्यात हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

३३८ कोटींची योजना

विभागातील पेंच लाभक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या सिंचनविहिरींचा सर्वाधिक लाभ होणार आहे. विभागातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यासाठी दोन टप्प्यांत हा कार्यक्रम राबविण्यात येईल. सिंचनविहिरींच्या धडक कार्यक्रमासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सिंचनविहिरींच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी ३३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यासाठी तरतूदही उपलब्ध करून देण्यात आली आहे. चौराई धरण होईपर्यंत २८ वर्षांपासून तोतलाडोह येथे उपलब्ध होणारे सर्व पाणी वापरण्यात येत होते. पिण्याचे पाणी व सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होते. ६१५ दशलक्ष घनमीटर पाण्याची तूट भरून काढण्यासाठी, सिंचनासंदर्भात उद्भवलेल्या गंभीर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कमी कालावधीत व दीर्घ कालावधीत पूर्ण होऊ शकणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश राज्यसरकारने दिले आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply