News

ममतांना धक्का; दोन खासदार भाजपमध्ये

11Views

दिल्ली:-

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा राजकीय शिरकाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करणाऱ्या तृमणूल काँग्रेसच्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूलचे खासदार सौमित्र खान व अनुप हजारा यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अर्पिता रॉय आणि शताब्दी घोष हे दोन खासदारही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं असून त्यामुळं ममतांची चिंता वाढली आहे.

दोन दिवसांपूर्वी सौमित्र खान यांनी तृणमूलला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा सौमित्र खान याला भ्रष्टाचारासाठी आधीच पक्षातून हकलले आहे, अशी सारवासारव तृणमुलच्या प्रवक्त्यांनी केली होती. सौमित्र खान यांच्या आधी तृणमूलचे क्रमांक दोनचे नेते मुकुल रॉय हे भाजपच्या तंबूत दाखल झाले आहेत. तृणमूलचे आणखी सहा खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

गेल्या चार वर्षांत संघ आणि भाजपने अत्यंत हुशारीनं पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद वाढवली आहे. राज्यात भाजपच्या तरुण सदस्यांमध्ये मोठी वाढ झाली असून तृणमूलमधून येणाऱ्या नेत्या, कार्यकर्त्यांचा ओघही वाढला आहे. भाजपनं अलीकडंच राज्यात एका रथयात्रेचे आयोजन केले होते. त्यामुळं धास्तावलेल्या ममता बॅनर्जी यांनी १९ जानेवारीला कोलकात्यात भाजपविरोधी रॅलीचं आयोजन केलं आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांनंतर वर्षभरात बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तेव्हा ममता बॅनर्जी भाजपचे आव्हान थोपवून पुन्हा विजयी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply