Uncategorized

मराठा क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन.

19Views

मुंबई:-

मराठा समाजातील तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जापैकी ८५ टक्‍के कर्जाची हमी सरकार घेणार होते. प्रत्यक्षात मात्र राज्य सरकारकडून आश्वासनाची पूर्तता होत नसल्‍याच्या निषेधार्थ मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबईतील व्यवस्‍थापक कार्यालयात मंगळवारी काही काळ ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राज्‍य सरकारने ७ ऑगस्‍टच्या आंदोलनावेळी मराठा समाजाच्या मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्‍या होत्‍या. त्‍याचा पाठपुरावा म्‍हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने १३ ऑगस्‍ट रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निवेदनही देण्यात आले होते. सरकारकडून ८५ टक्के कर्जाची हमी घेण्यात येणार होती. तसा शासननिर्णय जोपर्यंत लेखी स्‍वरूपात मिळत नाही तोपर्यंत आम्‍ही ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आबासाहेब पाटील व रमेश केरे पाटील यांनी दिली.

या आंदोलनानंतर सरकारने मागण्या मान्य केल्‍या आहेत. मात्र त्‍या निर्णयाच्या पूर्ततेबाबत सरकारी कार्यालयातच टाळाटाळ होणार असेल तर मराठा क्रांती ठोक मोर्चाची सरकारी कार्यालयांतच आंदोलने सुरू होतील, असा इशाराही रमेश केरे पाटील यांनी दिला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply