News

‘मर्डर’ झाल्याचा फोन करून आत्महत्या

26Views
नागपूर :-
‘गिट्टीखदान भागात युवकाचा मर्डरझाला’, असा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला करून युवकाने शौचालयात आत्महत्या केली. ही घटना भिवसनखोरी येथे रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. निशांत दिलीप वाघमारे (वय २७, रा. भिवसनखोरी’ असे मृतकाचे नाव आहे. तो मजुरी करीत होता. शनिवारी रात्री त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन केला. ‘गिट्टीखदान भागात मर्डर झाला आहे, लवकर या’, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिस नियंत्रण कक्षाने गिट्टीखदान पोलिसांना कळविले. पोलिसांचा ताफा त्याने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. तेथे काहीच नव्हते. पोलिसांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्याने मोबाइल ‘रीसिव्ह’ केला नाही. ‘मला कोणीतरी मारेल’, असे म्हणत तो घरून निघाला व मामाकडे गेला, तेथे झोपला. मध्यरात्री त्याने शौचालयातील लोखंडी पाइपला दुपट्टा बांधून गळफास घेतला. रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक भगत ताफ्यासह पोहोचले. पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. तो मनोरुण होता, असे सांगण्यात येते. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply