News

मसूदसोबत राहुल गांधी; अमेठीत पोस्टर झळकले.

10Views

अमेठी:

भाजपला लक्ष्य करताना ‘जैश-ए-मोहम्मद’च्या म्होरक्याचा मसूद अझहर’जी’ असा आदरार्थी उल्लेख केल्यानं टीकेचे धनी ठरलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मसूदसोबतचे फोटो असलेले पोस्टर अमेठीत झळकले आहेत. अमेठी हा राहुल गांधींचा मतदारसंघ असून, भाजपनं या पोस्टरमधून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

भाजप युवा मोर्चाचा कार्यकर्ता शुभम तिवारीनं हे पोस्टर लावले आहेत. त्यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर हा राहुल गांधी यांचा सत्कार करत आहे, असं दाखवण्यात आलं आहे. ‘दहशतवाद्याला ‘जी’ म्हणणारा खासदार अमेठीला नकोय’ असा उल्लेख पोस्टरवर केला आहे. ‘देशाच्या पंतप्रधानांचा अनादर करणारा, दहशतवाद्याचा सन्मान करणारा खासदार अमेठीला मान्य नाही, ‘ असंही पोस्टरमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी दहशतवाद्याला सन्मान देऊन भारतीय नागरिकांना मान खाली घालायला लावली आहे. अमेठीतील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कारण राहुल गांधी हे त्यांचे प्रतिनिधित्व करतात. अमेठीचा शुभचिंतक या नात्यानं पोस्टरच्या माध्यमातून माझी नाराजी व्यक्त करण्याचा निर्णय घेतला,’ असं शुभम तिवारीनं सांगितलं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply