News

महागाईचा झटका; पेट्रोल, डिझेलची दरवाढ

8Views

नवी दिल्ली 

पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग चौथ्या दिवशी आज रविवारीही वाढले. पेट्रोल आणि डिझेलमध्ये नव्या वर्षात झालेली ही मोठी दरवाढ आहे. ही दरवाढ करत तेल कंपन्यांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ४९ पैसे तर डिझेलच्या दरात ५९ पैसे प्रतिलिटरने दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल ४८ पैसे आणि डिझेल ५९ पैसे प्रतिलिटर दराने वाढले आहे.

इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोल ६९.७५ रुपये, मुंबई ७५.३९ रुपये प्रतिलिटर झालं. तर डिझेलचा दर मुंबईत ६६.६६ रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे.

ग्राहकांना लवकर दिलासा नाही!

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. पण आठवड्याच्या शेवटी ही दरवाढ थांबली आहे. मात्र, या दरवाढीचा परिणाम भारतावर दिसून आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील चढ-उताराचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होतो. यामुळे पेट्रोल, डिझेलच्या दरात लवकर कपातीची शक्यता कमी आहे, असं ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply