News

महाजनांची पाठ फिरताच अण्णांचे मोदींना स्मरणपत्र.

20Views

नगर :-

दोन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या उपोषणासंबंधी ज्य़ेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मनधरणी करण्यासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन नुकतेच राळेगणसिद्धीला येऊन गेले. त्यांची मध्यस्थी फोल ठरली. त्यांची पाठ फिरताच अण्णांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून आपण उपोषणावर ठाम असल्याचे कळविले आहे.

पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त सोमवारी देशभरातून शुभेच्छा दिल्या जात असताना हजारे यांनी मात्र स्मरणपत्र पाठवून आपल्या आंदोलनांची आठवण करून दिली आहे. मागील आठवड्यात मंत्री महाजन यांनी सरकारच्या वतीने हजारे यांची भेट घेतली. त्यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणेही करून दिले; मात्र, ठोस लेखी आश्वासन असल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका हजारे यांनी घेतली होती.

महाजन परत गेल्यानंतर सोमवारी हजारे यांनी पुन्हा पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आतापर्यंत केलेला पाठपुरावा, त्यावर सरकारने दिलेले आश्वासन याची आठवण करून देत आतापर्यंत यावर काहीच सरकारात्मक झाले नसल्याचे सांगून उपोषणावर ठाम असल्याचे कळविले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply