News

महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी/कामगार संघटनेचे बेमुदत कामबंद आंदोलन

19Views

सावनेर.:-

सावनेर तालुका प्रतिनिधि
विनयकुमार वाघमारे

आज दिनांक १/१/२०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील नगर परिषद नगर पंचायती मधे बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले त्याच अनुशंगाने कर्मचारी संघटना नागपुर जिल्हा अध्यक्ष धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली नगर परिषद सावनेर येथे बेमुदत कामबंद आंदोलन करण्या करिता सर्व कर्मचारी एकत्र आले व त्यांनी दिनदयाल उपाध्याय आयोदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मधील सहायक- प्रकल्प अधिकारी/ समुदाय संघटक यांना शासनाच्या सेवेत समावेशन करने, सातवा वेतन आयोग लागू करा, रोजंदारी कर्मचाऱ्याना कायम करा, नगर पंचायती मधील कर्मचाऱ्याचे समावेश झाले पाहिजे, सफाई कर्मचाऱ्याचे प्रश्न निकाली काढ़ा, अग्निशमन कर्मचारी पदोन्नति, विधानसभा पटलावर मांडलेल्या सफाई आयोगाच्या अहवालाची तात्काळ अंबलबजावनी करा, स्वच्छता निरीक्षकाचा संवर्ग तात्काळ करा, २००५ नंतर नियुक्ति झालेल्या कर्मचाऱ्याना जुनि पेंशन योजना लागू करा, नगर पालिका कर्मचाऱ्याना शासना प्रमाणे २४ वर्षाची थकबाकी मिळलीच पाहिजे, संवर्ग कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडविलेच पाहिजे, इत्यादि मागणी करिता नारेबाजी केली व शासनास मागण्या पूर्ण करण्याकरिता आंदोलनाची दिशा ठरविली,
जर हि मागण्या पूर्ण नझाल्यास संदर्भात शासन स्तरावर निर्णय नझाल्यास दिनांक १ जानेवारी २०१९ पासून सर्व अत्यावश्यक सेवे सह काम बंद आंदोलन करण्यात येईल असे मत कर्मचारी यूनियन कडून मांडण्यात होते.
या आंदोलनाला पूर्ण करण्याकरिता नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नागपुर जिल्हा अध्यक्ष धिरज देशमुख, सावनेर नगर परिषद कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष शेषरावजी वाडिकर, संघटनेचे सचिव पंकज छेनीया, संगटनेचे कोषाध्यक्ष संजय वाघमारे व समस्त कर्मचारी संघटनेचे सदस्य उपस्थित होते,

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply