nagpurruralNews

महिलांनीच महिलांचा सन्मान करणे काळाची गरज – नवनीत राणा.

जागतिक महिला दिनानिमित्त सैनिकांच्या माता व पत्नींचा नवनीत राणा यांचेहस्ते सत्कार *सबला महिला विकास महासंघाचा अभिनव उपक्रम

14Views

काटोल:-

प्रतिनिधी :- अनिल सोनक

स्थानिक सबला महिला विकास महासंघ काटोल च्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शुरवीर सैनिकांच्या माता व पत्नींच्या सत्कार समारंभाचे भव्य आयोजन आॅरेंज प्लाझा काटोल येथे करण्यात आले होते. या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नवनीत रवि राणा, सबला महिला विकास महासंघाच्या अध्यक्षा आरती अनिल देशमुख, डॉ. वंदना रामटेके, डॉ. संगीता ढोकणे, रजनी रगतपुरे, तुळसाबाई जिवने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरवातीला अंजली रत्नाकर ठाकरे हिने देशभक्ती गीत सादर केले त्यानंतर भारतमातेच्या फोटोला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण व दिपप्रज्वलन करण्यात येवुन पुलवामा येथे भारतीय केंद्रीय राखीव दलाच्या शहिद सैनिकांना मानवंदना श्रद्धांजली देण्यात येवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यासोबतच महिलांना सक्षम करण्यासाठी महिला उद्योजिका व बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या की आज महिलांनीच महिलांचा सन्मान करणे आवश्यक असुन कोणाच्याही मुलीबद्दल किंवा सुनेबद्दल काहीही बोलताना विचार करून बोलले पाहिजे तसेच महिलांनी आपल्या स्वभावात बदल चुगल्या लावणे बंद केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होऊ शकेल आजच्या परिस्थितीत महिला हीच महिलेची शत्रू आहे तेव्हा एकोपा वाढवून आपण पुढे जाण्याकरीता प्रयत्न करावे.सैनिकांच्या कुटुंबाला शासन मोठ्या प्रमाणात रक्कम जरी देत असेल पण कुटुंबातील आधारवड जर उन्मळून पडला तर त्यांची उमेद खचते त्यामुळे शेतकरी व सैनिक यांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे त्याबाबतीत राजकारण करण्याची गरज नाही असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी सैनिकांच्या माता व पत्नींचा सत्कार महिला दिनानिमित्त होत आहे ही खरोखरच गौरवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply