News

मानहानी प्रकरण: पत्रकार रमानी यांना जामीन.

45Views

दिल्ली :-

माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांची मानहानी केल्याप्रकरणातील आरोपी महिला पत्रकार प्रिया रमानी यांना दिल्ली कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १० हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर हा जामीन देण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मार्चला होणार आहे.

दिल्ली कोर्टात १० एप्रिल या दिवशी रमानी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर रमानी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळणार आहे. यावर सत्य हाच माझा बचाव आहे, अशा शब्दात रमानी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एम. जे अकबर यांच्यावर तब्बल २० महिला पत्रकारांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले. त्यांपैकी रमानी या आरोप करणाऱ्या पहिल्या महिला पत्रकार आहेत.

रमानी यांनी अकबर यांच्यावर केलेले आरोप प्रथमदर्शनी बदनामीकारक असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. आपल्यावरील सर्व आरोप खोटे आणि कपोलकल्पित असल्याचे एम. जे. अकबर यांचे म्हणणे आहे. अकबर यांनी आपले म्हणणे कोर्चात मांडले आहे. आपल्यावर करण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचे अकबर यांनी कोर्टात म्हटले आहे. यानंतर रमानी आपले म्हणणे कोर्टात मांडणार आहेत.

एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर त्यांनी १७ ऑक्टोबर या दिवशी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

एम. जे. अकबर हे मध्यप्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी ५ जुलै २०१६ या दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी ते झारखंडमधून राज्यसभेचे खासदार झाले होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply