News

मार्चअखेर एसटी बस ‘ऑनलाइन’

27Views

औरंगाबाद : – 

मार्च २०१९अखेरपर्यंत राज्यातील सर्व १७ हजारांवर एसटी बस ऑनलाइन करण्यात येणार आहेत, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक, महामंडळाचे उपाध्यक्ष रणजित सिंह देओल यांनी पत्रकारांना दिली.

एसटी अधिकाऱ्यांची गुरुवारी (११ ऑक्टोबर) वाल्मी येथे बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सांगितले की, एसटी बसचे आयुष्य १५ वर्षे करण्यात आले आहे. यासाठी लाल बसची फेरबांधणी बंद करून, त्याऐवजी नवीन बस कोडप्रमाणे ‘एमएस बॉडी’च्या बस तयार केले जात आहेत. त्याचे काम मध्यवर्ती कार्यशाळेत सुरू आहे. डिझेलच्या वाढत्या दराबाबत एसटीची हंगामात दहा टक्के दरवाढ ही योग्य उपाय योजना असल्याचे सांगितले. सिडको बस स्थानकात बसपोर्ट उभारणार आहे; तसेच सीबीएस बस स्थानकाची फेरबांधणी केली जाईल.

एसटी बस ऑनलाइन करण्याबाबत देओल यांनी सांगितले की, सध्या नाशिक येथे एसटी बस ऑनलाइन करण्याचे पायलट प्रकल्प सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी होताच राज्यातील सर्व बस गाड्या ऑनलाइन करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. आगामी मार्च २०१९पर्यंत या गाड्या ऑनलाइन होतील.

\Bस्लीपर बसबाबत फेरविचार सुरू

एसटी महामंडळात सध्या स्लीपर बस तयार करण्याचा प्रयोग सुरू आहे. स्लीपर बसचे भाडे, साध्या सिटिंग बसपेक्षा दीडपट अधिक आहे. यामुळे याचा फेरविचार सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवशाही आता एसटीचा ब्रँड

शिवशाही बस एसटी महामंडळाचा ब्रँड तयार झाली आहे. हा ब्रँड अधिक यशस्वी करण्यासाठी, चालकांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. खासगी किंवा एसटीचे चालकांना प्रशिक्षण शिवाय शिवशाही देण्यात येऊ नये, असे आदेश आहेत. ‘शिवशाही’त टायर आणि बसमध्ये तांत्रिक दोष आढळले होते. तेही दूर करण्यात आले असल्याचे देओल यांनी स्पष्ट केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply