News

मिथुन चक्रवर्ती उपचारासाठी अमेरिकेला रवाना

18Views

मुंबई:

पाठीचं दुखणं पुन्हा उफाळून आल्यानं ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तीउपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान स्टंट करताना त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती.

अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथील एका रुग्णालयात पाठीच्या दुखण्यावर उपचार करण्यासाठी त्यांना अमेरिकेत हलवत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली. २००९ साली ‘लक’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान एका दृश्यादरम्यान स्टंट करताना मिथुन यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर २०१६ मध्येही त्यांनी यासाठी उपचार घेतले. दोन वर्षांनंतर आता पुन्हा पाठीचा त्रास सुरू झाल्यामुळे ते अमेरिकेला गेले आहेत.

आपल्या अनोख्या आणि बिनधास्त नृत्यशैलीमुळे बॉलिवूडमध्ये मिथुन यांची वेगळी प्रतिमा आहे. ‘जीनियस’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा एक भयपट असून, याचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यानं केलं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply