nagpurruralNews

मुक बधिर,कर्ण बधिर विद्यार्थ्यांच्या जील्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

56Views

सावनेर:-

प्रतिनिधी:-साहिल ढवळे

मंगला बहुउद्देशीय तांत्रिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था नागपूर द्वारा संचालित मुक बधिर निवासी शाळा सावनेेरच्या वतीने कर्ण बधिर विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय आंतर शालेय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न झाल्या;…
स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील सहा शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.स्पर्धा एकेरी व दुहेरी दोन्ही प्रकारात मुला मुली करिता वेगवेगळ्या आयोजित केल्या होत्या स्पर्धेच्या उदघाटन योगेश पारधी पोलीस निरीक्षक सावनेर यांच्या हस्ते,संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांतजी डवले, प्रा. योगेश पाटील, पत्रकार विजय पांडे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मंगला समर्थ उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते स्व. लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला मल्यार्पण करण्यात आले,संस्थे चे अध्यक्ष श्री प्रशांतजी डवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,श्री योगेश पारधी यांनी कर्णबधिर विध्यार्थ्यां करिता बॅडमिंटन स्पर्धेचे कौतुक केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.योगेश पाटील यांनी स्पर्धे करीता इनडोअर हॉल उपलब्ध करून दिला व दरवर्षी आयोजनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.समारोपीय कार्यक्रमाला संस्थेचे सचिव नारायणराव समर्थ,संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी श्री मुकंदजी काशीकर, वरिष्ठ समाजसेवी पत्रकार व विदर्भ मीडिया न्यूज चे तालुका प्रतिनिधी किशोर ढुंढेले, स्क्रीन मीडिया प्रतिनिधी साहिल ढवळे, पीयूष झिंझुवाडीया, हर्ष किंग कँमेरा मँन विदर्भ मीडिया शाळेचा मुख्यध्यापिका सौ. मंगला समर्थ इत्यादी उपस्थित होते; यावेळी संस्थेचे सचिव नारायणराव समर्थ यांनी स्पर्धेचा आयोजनाचा उद्देश व उपेक्षीत घटकांकरीता समाजाची लागणारी आवश्यकता याविषयी विचार व्यक्त केले; वरिष्ठ समाज सेवी पत्रकार श्री किशोर ढुंढुले तसेच मीडिया प्रतिनिधि,साहिल ढवळे(स्टार एपेक्स) ,पीयूष झिंझुवाडीया (न्यूज प्रभात)हर्ष किंग यांचा संस्थेचा वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला;श्री किशोर ढुंढेले यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटका करीता सत्यत्याने काम करून त्यांना समाजाचा मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रयन्त करत असल्याचे तसेच प्रसार माध्यमातून प्रसारीत बातम्यांच्या आधारे समस्यांना वाचा फोडने ज्यामुळे समाजात प्रसार माध्यमाची विश्वसनियता टीकवने काळाची गरज असल्याचे म्हणत प्रसार मध्यम हे लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ असुन काळाची गरज आहे असे विचार विशीद केले,उपस्थित मान्यवरांचा हस्ते विजेता व उपविजेता खेळाडूंना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले मुकबधिर शाळा सावनेर येथील विजयदास दसरिया एकरीमध्ये द्वितीय क्रमांक कु.कामिनी प्रगट, द्वितीय क्रमांक कु खुशी चोधरी व कु.मयुरी नखाते दुहेरीमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला,सहभागी खेळाडू ना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली, स्पर्धा च्या आयोजनास विनोद घोलप,दुर्गा चेडे सह शाळेतील शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांची सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन क्रीडा शिक्षक श्री सुनील राठोड यांनी तर आभार संजय लुंगे यांनी मानले , स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न केल्या बद्दल संस्थेच्या वतीने सर्वाचे कौतुक करण्यात आले…
उपस्थित सर्व मुक बधिर कर्ण बधिर विद्यार्थ्यांना मान्यवरांचे मनोगत श्रीमती नलिनी आंगोने यांनी सांकेतीक भाषेत समझवून सांगितले हे विशेष

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply