nagpurruralNews

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा फज्जा

370Views

जलालखेडा :- योगेश चौरे (प्रतिनिधी)

·        मदना ते बोपापूर रस्ता बनविल्यानंतर एका दिवसात उखडला

·        ठेकेदार व अभियंत्यांचे संगममताने होतात अशी निकृष्ठ दर्जाची कामे

·         शेतकऱ्यांनी दिले सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

एकीकडे शासन ग्रामीण भागात अनेक प्रकारची विकास कामे करीत आहे. पांदन रस्ता असो कि जलयुक्त् शिवार असो सर्वासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करीत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा व त्यांचे जीवनमान चांगले व्हावे. दुसरीकडे शासनाने नेमून दिलेले ठेकेदार व अभियंते यांच्या संगममताने निकृष्ठ दर्जाचे काम होत आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे नरखेड तालुक्यातील मदना ते बोपापूर रस्ता होय. हा रस्ता बनविल्यानंतर एकाच दिवसात उखडला. रस्त्या वरील डांबरी कारण आपोआप निघत आहे. रस्त्याच्या खालची गिट्टी सुद्धा निघत आहे. मदना ते बोपापूर हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बांधल्या गेला आहे. या रस्त्याची लांबी १.२ किमी आहे. हा रस्ता डांबरी व खडीकरण करण्यात आले. पण ते इतक्या निकृष्ठ दर्जाचे आहे कि एकाच दिवसात या मुख्य मंत्री ग्राम सडक योजनेचा फज्जा झाला.

या १.२ किमी रस्त्यासाठी ४८.३७ लक्ष रुपये ग्राम विकास मंत्रालया कडून मंजूर करण्यात आली. शासनांनी शेतकऱ्यांचा माल हा सरळ घरी पोहचावा व त्यांचे शेती उपयोगी यंत्र सरळ शेतात जावे यासाठी हि योजना आणली. पण या योजनेचे तीनतेरा ठेकेदार व अभियंते संगम मताने वाजवीत आहे. रस्त्याची साईड बायडिंग पाणी न टाकता  दबाई करण्यात आली. तसेच डांबरीकरण करण्यात आले व एका दिवसातच उखडले. अजूनपर्यंत पावसाळा सुद्धा लागायचा आहे व हा रस्ता गिट्टी सह उखडला आहे. रस्त्याच्या बाजूला मुरूम न टाकता तेथे काळी माती टाकली. यामुळे हा पूर्ण रस्ता जागोजागी उखडत चालला आहे. डांबर एवजी जळलेले आईल टाकण्याचा प्रकार सुद्धा येथे चालू आहे. त्यामुळेच या रस्त्यावरील डांबरीकरण उखडले आहे असे आरोप येथील शेतकऱ्यांनी केले आहे.

हि बाब देवग्राम येथील शेतकऱ्यांना जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले. त्यांनी या निवेदनात म्हटले कि असे निकृष्ठ दर्जाचे काम येथील ठेकेदार करीत आहे. पावसाळा  लागायच्या आधीच या रस्त्यावरील डांबरीकर व गिट्टी बाहेर येत पावसाळा लागल्यानंतर  हा रस्ता दिसणारच नाही. शेतकरी या रस्त्याचा नेहमी वापर करीत असतात. अश्या प्रकारची निकृष्ठ दर्जाची कामे होत या सर्वाला जबाबदार कोण? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे. या सर्व कामाची चौकशी लवकरात लवकर करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा येथील शेतकर्यांनी जनआंदोलनाचा इशारा दिला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply