News

मुलानं फेटाळलं!कादर खान यांच्या निधनाचं वृत्त

24Views

मुंबई:

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाचं वृत्त त्यांचा मुलगा सरफराज खान यानं फेटाळलं आहे. ‘माझे बाबा रुग्णालयात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या निधनाचं वृत्त साफ खोटं आहे. ही निव्वळ अफवा आहे,’ असं सरफराजनं म्हटलं आहे.

कॅनडात वास्तव्यास असलेले ८१ वर्षीय कादर खान हे गेल्या काही वर्षांपासून प्रोग्रेसिव्ह सुपरन्यूक्लियर पाल्सी या आजारानं त्रस्त आहेत. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती अधिकच खालावल्यानं व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.

हे वृत्त आल्यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनी कादर खान यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी असं ट्विट केलं होतं. मात्र, सोशल मीडियात त्यांच्या प्रकृतीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. कादर खान यांच्या निधनाचं वृत्तही व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालं होतं. खान यांच्या कुटुंबीयांना या अफवांबद्दल समजताच त्यांनी तातडीनं खुलासा केला आहे. बाबांची प्रकृती स्थिर असल्याचं सरफराज खान यांनी म्हटलं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply