News

मुलासाठी अजित पवार सरसावले; मावळमध्ये बैठकसत्र.

11Views

पिंपरी :-

मावळ लोकसभेचे ‌उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित होण्याच्या मार्गावर आहे. या मतदार संघातून पार्थला विजय मिळवा, या साठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरसावले आहेत. मा‌वळ मतदारसंघातील त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून, काही पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.

मा‌वळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या पार्थ यांनी गेल्या काही महिन्यापासूनच पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. पंधरा दिवसापूर्वी मावळ मतदारसंघात येत असलेल्या चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराला भेट देत पार्थ यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत स्वतंत्रपणे प्रचाराला सुरुवात केली आहे. दुसरीकडे अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत मुलासाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दहा वर्षांपासून ‘मा‌वळ’वर शिवसेनेचे वर्चस्व असून शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ‘मा‌वळ’मधून खासदार झाले होते. त्यांचा मुलगा असलेल्या पार्थ यांनी राजकारणाचा श्रीगणेशा याच मतदारसंघातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीत माघार घेत असल्याचे जाहीर करत आपण तरुण पिढीला म्हणजेच पार्थ पवार यांना संधी देत असल्याचे सांगितल्याने पार्थ हेच आता मावळमधून लढतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. विद्यमान खासदार यांच्या विरोधात उतरविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’कडे स्थानिक तुल्यबळ ‌उमेदवार नव्हता. स्थानिक पदाधिकाऱ्याला संधी दिल्यास हा ‌उमेदवार निवडणुकीत किती चालेल याची शाश्वती पक्षाच्या नेत्यांनी नसल्याने पार्थ यांना संधी द्यावी, अशी पदाधिकाऱ्यांची एकमुखी मागणी होती. अजित पवार यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले असल्याने मावळ मतदार संघात त्यांना मानणारा वेगळा गट आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये देखील अजित पवाराची यांची विशेष ताकद आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे मावळमधून पार्थ पवारांची उमेदवारी चर्चेत आली.

\B

पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप\B

या मतदारसंघातून मुलगा पार्थ याला निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी स्वत: कंबर कसली आहे. पनवेलमधून कार्यकर्त्यांच्या बैठकीला प्रारंभ करीत आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील पवार यांनी घेतल्या असून, त्यांच्याकडे काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. काही अडचण, शंका निर्माण झाल्यास त्याचे निवारण करून संपूर्ण माहिती रोजच्या रोज देण्याच्या सूचनाही अजितदादांनी केल्या आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply