News

मुलीची आत्महत्या ठाण्यातील प्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञांच्या

28Views

ठाणे:-

ठाण्यातील प्रसिद्ध त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांच्या मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्याकेल्यानं खळबळ उडाली आहे. तणावाखाली असल्यामुळे सोम यांच्या कन्येने आत्महत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं. ठाण्याच्या कोलशेत येथील एव्हरेस्ट इमारतीत सोम कुटुंब राहतं. आज सकाळी कावेरी सोम यांची कन्या शर्मिष्ठा सोम यांनी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शर्मिष्ठा यांनी आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याने ठाण्यात खळबळ उडाली. शर्मिष्ठा या एबीबीएस असून तणावाखाली असल्यानं तिने आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतं. शर्मिष्ठाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केवळ अभ्यास न झाल्यामुळे तणावाखाली तिने हे पाऊल उचलले असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply