News

मुष्टियुद्ध खेळाडू अल्फिया पठाण हिची भारतीय मुष्टियुद्ध संघात निवड झाली आहे.

9Views

नागपूर : –

शहरातील प्रतिभावंत मुष्टियुद्ध खेळाडू अल्फिया पठाण हिची भारतीय मुष्टियुद्ध संघात निवड झाली आहे. अल्फिया ९ ते १४ एप्रिलदरम्यान मुरसिया (स्पेन) येथे होणाऱ्या युवा व ज्युनियर गटाच्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रोहतक येथील एनबीएच्या साई सेंटरमध्ये या संघाच्या निवडीसाठी नुकतीच चाचणी घेण्यात आली होती. अल्फियाने या चाचणीदरम्यान हरयाणाच्या मनप्रीत कौरला पराभूत केले होते. तिच्या या कामगिरीच्या आधारे भारतीय संघात तिची भारतीय संघात निवड करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अल्फिया ८० किलोपेक्षा अधिक वजनगटात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अल्फिया ही सेंट विन्सेंट पलोटी स्कूलची विद्यार्थीनी असून सध्या दहाव्या वर्गात आहे.

अल्फियाने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदक पटकाविले आहे. पोलिस मुख्यालयात कार्यरत अक्रम पठाण यांची ती कन्या आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात प्रशिक्षक गणेश पुरोहित व अरुण बुटे यांच्या मार्गदर्शनात ती सराव करते. याशिवाय अल्फियाला नीतेश गोटे व फिजिकल ट्रेनर गुज्जू यांचेही मार्गदर्शन लाभते आहे. भारतीय संघात निवड झाल्याबद्दल एनबीएचे अध्यक्ष जय कवळी, सचिव राकेश तिवारी, नागपूर जिल्हा मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष सज्जाद हुसैन, सचिव अ‍ॅड. पोरस कोतवार, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी अल्फियाचे अभिनंदन केले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply