nagpurruralNews

मोटरसायकल च्या अपघातात वकीलाचा मृत्यू .

बेसूर सीलेपार शिवारातील घटना

27Views

उमरेड:-

प्रतिनिधी:-राम  वाघमारे

मृतक :- किशोर कुमार वासुदेव कुथे
रा. पुळेगाव ता. लाखांदूर जिल्हा. भंडारा
मोटारसायकल क्रमांक:- MH- 36 -P- 1287
सदर मृतक हा पुळेगाव येथील रहिवासी असून तो उमरेड गिरड मार्गावरील सिलेपार शिवारातील रोडलगतच्या झाडावर आदळून मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात समजते.
सदर घटना पहाचे पाच वाजताची असल्याने या अपघातात या मृतकाला कोणीही मदतीसाठी आले नसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. सकाळी येजा सूरू झाल्यावर गर्दी सूरू झाली घटनास्थळी उमरेड पोलीसही दाखल झाले पण मृतकाची ओळख पटत नसल्याने सारेच गोंधळून गेले.
अन ओळख पटली
घटनास्थळी पोलीसांचा ताफा दाखल झाल्यावर मृतकाची तपासणी करण्यात आली त्यात त्याचे जवळ बॅग सापडली त्यात त्याचे आधार कार्ड व बार काऊंसीलीगंचे ओळपत्र सापडले त्यावरून त्याची ओळख पटली.
मृतकाचे मोबाईल वरून घरी फोन लावण्यात आला व झालेल्या अपघाताची माहीती देण्यात आली. पण घरच्यांनी प्रतीसाद दिला नसल्याने तो मृतक घरून निघूनतर आला नसेल असा तर्क वितर्क लावल्या जात आहे.
सदर झालेल्या अपघाताची उमरेड पोलीसांनी दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवीण्यात आला.
पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहेत

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply