News

मोदींच्या बायोपिकमध्ये रतन टाटांच्या भूमिकेत बोमन इराणी.

36Views

मुंबई: –

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये कोणती भूमिका कोण साकारणार हे हळू-हळू समोर येत आहे. या चित्रपटात आता अभिनेते बोमन इराणीदेखील झळकणार आहेत. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांची भूमिका ते साकारणार आहेत.

बोमन इराणी यांनी अहमदाबादमध्ये चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात केली आहे. या भूमिकेबद्दल सांगताना बोमन म्हणाले,’माझ्या आणि रतन टाटांच्या दिसण्यात साम्य आहे असं अनेक जण मला सोशल मीडियावर सांगायचे. मी नेहमी विचार करायचो मला जर भविष्यात मोठ्या पडद्यावर रतन टाटांची भूमिका साकारायला मिळाली तर मला किती आनंद होईल. आणि एके दिवशी मला उमंग कुमारचा फोन आला. मोदींच्या बायोपिकमध्ये रतन टाटांची भूमिका करणार का? असं त्यानं मला विचारलं. मी क्षणाचाही विलंब न करता त्याला होकार कळवला.’

या चित्रपटाचं दिग्दर्शन उमंग कुमार करत आहेत. या चित्रपटात विवेक ओबेरॉयसोबत अभिनेते मनोज जोशी, अभिनेत्री बरखा बिश्त महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply