News

‘मोदी विकणार चहा अन् अमित शहा वडे!’

21Views

नाशिक :-

दोन कोटी नोकऱ्या देणाऱ्या भाजपने किती नोकऱ्या दिल्या, असा प्रश्न करत ‘एमआयएम’चे आमदार इम्तियाज जलिल यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पण, आमचे सरकार आल्यानंतर दोन लोक बेरोजगार होणार आहे. त्यामुळे त्यांना काम देण्यासाठी मी अॅड. प्रकाश आंबडेकरांना सांगणार आहे. त्यामुळे नाशिकच्या स्टेशनवर मोदी … मित्रो चहा.. चहा करतांना मोदी दिसेल आणि वडा विकतांना अमित शहा दिसेल, असे हल्लाबोल करीत मोदी-शहा जोडीकडून करण्यात आलेल्या रोजगाराच्या दाव्याची खिल्ली उडवली.

रविवारी दुपारी ३ वाजता होणाऱ्या या सभेला मोठी गर्दी होईल, असा अंदाज होता. त्यामागे आयएमआयचे नेत खासदार असुद्दीन ओवेसी व अॅड. आंबेडकर हे एकत्र येणार हे होते. पण, ओवीसीची गैरहजेरी असतांही या सभेला गर्दी झाली. त्यांच्या गैरहजेरीमुळे ओवेसी समर्थक नाराज झाले. त्यांनी सभेतून काढता घेतला. तरीपण, सभेत गर्दी कायम होती. या सभेत एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, ‘उपरा’कार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, अमितभाई भोईगर, प्रा. किसन चव्हाण यांचे भाषण झाले. या सभेचे संयोजन ‘भारिप’चे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांनी केले.

तृतीयपंथी पिंकीचे भाषण 

तृतीयपंथी दिशा पिंकी शेखचे भाषण यावेळी झाले. शेख यांनी आपल्या भाषणात या वंचित आघाडीमुळे वंचितापेक्षा वंचित असलेल्या आम्हाला व्यासपीठ मिळाल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्हाला हक्क मिळाल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

वंचितांची मोट बांधण्याचा प्रयत्न 

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भारिप बहुजन महासंघाने वंचित बहुजन आघाडीच्या अधिवेशनाचे निमित्त करून नाशिकमध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी सर्व समाजातील वंचितांना एकत्र करून अनंत कान्हेरे मैदानात मोठी गर्दी गोळा करुन शक्तीप्रदर्शनही केले. यापूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांची नाशिकमध्ये मोठे पाठबळ मिळाले नव्हते. पण, या सभेमुळे त्यांना मोठे बळ मिळाले. या सभेत धनगर, माळी, वंजारी, भटके विमुक्त, मुस्लिम यासह विविध जातीच्या नेत्यांची मोट बांधूल्याचेही दिसले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply