News

मोबाइल बॅटरीचा स्फोट; चार जखमी

9Views

शहापूर :- 

मोबाइल बॅटरीच्या स्फोटाने शहापूरच्या कासार आळीतील प्रतीक्षा अपार्टमेंट शुक्रवारी सकाळी हादरली. या अपार्टमेंटमधील शिंदे यांच्या घरात झालेल्या या दुर्घटनेमध्ये कुटुंबामधील चारजण भाजले आहेत. गंभीररित्या भाजलेल्या शिंदे दाम्पत्याला ठाणे येथे उपचारासाठी हलविले आहे.

शहापूरच्या कासार आळीतील प्रतीक्षा अपार्टमेंटच्या तळमजल्यावर शिंदे कुटुंबीय रहातात. सकाळी राजेश शिंदे यांनी मोबाइल चार्जिंगला लावला आणि ते परत झोपले. थोड्या वेळाने अचानक बॅटरीचा स्फोट झाला व घरात एकच गोंधळ उडाला. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने शेजारील रहिवासी धावत आले. त्यांनी शिंदे कुटुंबीयांना घराच्या बाहेर काढले. शेजाऱ्यांनी तत्काळ पाणी व माती फेकून आग विझवली व शिंदे कुटुंबीयांना शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविले. या दुर्घटनेत राजेश व रोशनी शिंदे या दाम्पत्यासह त्यांची ऋतुजा व अभिषेक ही दोन मुले भाजली आहेत. शिंदे दाम्पत्य गंभीररित्या भाजले असून त्यांना पुढील उपचारासाठी ठाणे येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले. मोबाइलच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने ही दुर्घटना झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply