nagpurruralNews

युको बँक रामटेक शाखेने 76 वा वर्धापन दिन साजरा केला.

18Views

रामटेक:-

तालुका प्रतिनिधी:-ललित कनोजे

भारतातील राष्ट्रीयकृत बँका पैकी अग्रगण्य असलेली युनायटेड कमर्शियल बँक स्थापन होऊन 76 वर्षे पूर्ण झाल्याने बँकेच्या रामटेक येथील शाखेत बँकेचा 76 वा स्थापनादिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामटेक येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कमलाकर लेंडे होते.रामटेकचे तहसीलदार धर्मेश फुसाटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलनाने स्थापना दिवस कार्यक्रमाचे उद्घाटन केले.यावेळी आपल्या प्रमुख भाषणात तहसीलदार धर्मेश फुसाटे यांनी केंद्र व राज्य शासनाच्या सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या योजना बँकेने उचलून धराव्यात त्यासाठी योग्य ते सर्व सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाखा प्रबंधक सुशिल गुप्ता व राजन कुमार सिंग यांनी आपल्या भाषणातून बँकेच्या आतापर्यंतच्या कामकाजाची माहिती दिली बँकेने आपल्या स्थापनेपासून सातत्याने सर्वसामान्यांची बँक म्हणून काम केल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. या कार्यक्रमाला बँकेचे ग्राहक प्रशांत किंमतकर,अरुण रेड्डी, विश्वास पाटील, श्रीनिवास रेड्डी,गोकुळ पाटील, गोपी कोल्हेपरा,ज्योती कोल्हेपरा आदी उपस्थित होते.स्‍थापना दिवसाचे औचित्य साधून याप्रसंगी उपस्थित रामटेक तालुक्यातील पत्रकार सर्वश्री त्रीलोक मेहर, प्रशांत येडके यांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन राजन कुमार सिंग यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार सहाय्यक प्रबंधक प्रशांत मेहेर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेतील अधिकाऱ्यांसह बँक कर्मचारी सर्वश्री रोहित मेश्राम,दिपाली पाटील, प्रसाद, विवेक भंडारकर, शिवपाल चंदनबटवे,संजय बोरकर आदींनी प्रयत्न केले अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply