News

युतीसाठी राजकीय सौदेबाजी – आशिष देशमुख

13Views

नागपूर:-

लोकसभा निवडणुकीत युती व्हावी, म्हणून राजकीय स्वार्थासाठी भाजपने शिवसेनेची अट मान्य करून सौदेबाजीत नाणार प्रकल्प रद्द केल्याचा आरोप भाजपमधून काँग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख लावला.

राज्यात भाजप सरकारने एकही मोठा प्रकल्प आणलेला नाही. नवीन गुंतवणूक आली नाही. रोजगाराची आश्वासने देऊन राज्यकर्त्यांनी बेरोजगार तरुण व जनतेची दिशाभूल केली. माझ्या मागणीनंतर हा प्रकल्प विदर्भात नेण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार येथेच प्रकल्प उभारण्याच्या हट्टापायी विदर्भाचा विचार केला नाही. अनेक राज्यात इनलॅन्ड रिफानरी व पेट्रोलियम प्रकल्प असताना विदर्भात का नाही, अशी विचारणा करणारे पत्रही मुख्यमंत्र्यांना दोनवेळा दिले. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. निवडणुकीच्या तोंडावर झालेली राजकीय सौदेबाजी जनतेच्या लक्षात आली आहे. येत्या निवडणुकीत मतदार नक्कीच परिवर्तन घडवून आणेल.

तीन लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगांना चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे याचा विचार करण्यात यावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ६ आठवड्याचे अधिवेशन घेऊन विदर्भातील जनतेला न्याय द्यावा, असेही आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply