News

रणबीर कपूर आणि आलिया भट लवकरच विवाहबंधनात अडकणार.

10Views

मुंबई: 

बॉलिवूडचे ‘हॉट अॅण्ड स्वीट कपल’ असलेले रणबीर कपूर आणि आलिया भट लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर्करोगावर उपचार घेणारे अभिनेते ऋषी कपूर लवकरच भारतात परतणार असून त्यानंतर या दोघांच्या लग्नाची तारीख ठरवली जाणार आहे.

नितू सिंग यांनी इन्स्टाग्रामवर या संदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. साधारण मार्चअखेरपर्यंत ऋषी कपूर भारतात परततील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. त्यानंतर रणबीर-आलियाच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यात येईल, अशी शक्यता आहे. २०२०च्या सुरुवातीला दोघंही विवाहबंधनात अडकतील, अशी सिनेजगतात चर्चा आहे.

रणबीर आणि आलियानं मात्र या चर्चेबद्दल काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या दोघंही ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. या सिनेमात रणबीर आणि आलियासोबत अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा डिसेंबर २०१९मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply