News

रणवीर सिंहने अक्षय कुमारला बॉक्स ऑफिसवर टाकले मागे

18Views

मुंबई: 

रणवीर सिंहच्या ‘सिम्बा’ या चित्रपटाने केवळ ९ दिवसांत १७० कोटींची कमाई केली आहे. या बम्पर कमाईसह रणवीर सिंहने सुपरस्टार अक्षय कुमारला मागे टाकलं आहे. अक्षय कुमारच्या पाच सुपर हिट चित्रपटांनी २०१२मध्ये तब्बल ४१३ कोटी रुपयांची कमाई केली होती तर रणवीरच्या दोन चित्रपटांनीच यंदा ४६५ कोटींची कमाई केली आहे.

गेल्या वर्षभरात रणवीरचे पद्मावत आणि सिम्बा हे दोनच सिनेमे प्रदर्शित झाले. या दोन चित्रपटांनी आतापर्यंत ४६५ कोटींची कमाई केली. यासोबतच रणवीर सिंह बॉलिवूडमधला दुसरा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. या यादीत पहिला क्रमांक सलमान खानचा आहे. सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो ‘आणि ‘बजरंगी भाईजान’ या दोन सिनेमांनी २०१५मध्ये ५३० कोटींची कमाई केली होती. रणवीर सिंह हा आकडा पार करण्याची शक्यता कमी असल्याचं मत बॉक्स ऑफिसच्या अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. येत्या आठवड्यात द अॅक्सीडेंटर प्राईम मिनिस्टर, मणिकर्णिका, ठाकरे सारखे चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार असून याचा सिम्बाच्या कमाईवर परिणाम होईल.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply