nagpurrural

रस्त्याच्या निकृष्ट बांधकामांवर कारवाई करा.

मुख्यअभीयंत्यासमोर नागरिकांचा संताप *ऑन द स्पॉट पाहणीत कारवाईचे आश्वासन

26Views

अंजनगाव सूर्जी :-

प्रतिनिधी:- प्रविणकूमार बोके

येथील नविनबसस्थानक ते शिक्षक सहकारी बँक पर्यंत बांधण्यात येत असलेल्या दहा कोटी रुपयाच्या काॕंक्रिट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून याला ठेकेदारासह संबधीत अधिकारी जबाबदार असून संपूर्ण कामाची चौकशी करुण कारवाई करण्याची मागणी शहरातील नागरिकांनी मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांना केली असून सोमवारी (ता११) ऑन द स्पॉट पाहणीत अनियमित कामकाजाच्या बाबी समोर आल्याने चांगलीच शाब्दिक चकमक याठिकाणी घडल्याचा प्रकार घडला
शहरातील मूख्य मार्ग असलेल्या दर्यापूर रोडवरील नविनबसस्थानक ते शिक्षक बँक या रस्त्याचे काम गेल्या अडिच वर्षापासून सूरू असून अजून पन्नास टक्के काम सुद्धा झाले नाही म्हणून नागरिकांना वेठीस धरल्याची परिस्थीती निर्माण झाली आहे.सोबतच रस्त्याचे काम करतांना संबंधित कंत्राटदार ईस्टिमेटप्रमाणे काम करित नसून काँक्रिट टाकण्यापूर्वी डांबराचा थर काढणे अपेक्षीत असतांना एकशे सत्तर मीटर रस्त्यावर डांबरावर काँक्रिटिरण केले, रस्ता आणि नाली याची लेवल सूध्दा जूळत नसल्याचे,तसेच खोदलेल्या कामात मिक्स केलेली गीट्टी टाकणे अपेक्षीत असतांना गिट्टी मिक्स नकरता तसेच टाकणे, रस्त्यावरुण जाणाऱ्या नागरिकांच्या सूरक्षेसाठी कोणती व्यवस्था संबधीत ठेकेदाराने केली नाही शिवाय ज्या लेआऊटला सर्व्हीस रोड नाही अशा नागरिकांना पर्यायी व्यवस्था न करता हेकेखोरपने अधिकारी व कंत्राटदार कामकाज करित आसल्याने सार्वजनिक बांधकाम च्या मुख्य अभियंत्यांना सोमवारी (ता.११) पाहणीसाठी बोलावण्यात आले तेव्हा नागरिकांनी मूख्य मुख्य अभियंत्यांच्या लक्षात या अनियमित कामकाजाच्या बाबी लक्षात आणून दिल्या तसेच हा रस्ता अडिच वर्षापासून बांधणे सूरु असल्याने आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला शैक्षणिक संस्था असल्याने दिवसभर नागरिकांची वरदळ या रस्त्याने सूरु असते ट्राफीकच्या सूरक्षेची व्यवस्था न केल्याने दररोज अपघात होतात ज्यात काही लोक अंपग सूध्दा झाल्याने संबधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आणि एस्टीमेट मधील काही बाबींना डावलून हे कामकाज होत असल्याचे खुद्द मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांच्या सुद्धा लक्षात आले हे त्यांन काबुल केले व संपूर्ण कामाची चौकशी करुण दोषीवर कारवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ,उपविभागीय अभियंता डी एस मांगे,कंत्राटदार बरडीया,आणि आमदार रमेश बुंदिले सह नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे,आनंद संगई,बंडू हंतोडकर, अविनाश गायगोले, सचिन गावंडे, प्रदिप निमकाळे,सीताबाई संगई संस्थेचे अध्यक्ष मुकूंद संगई,पत्रकार सूरेश साबळे,गजेन्द्र मंडलिक ,प्रविण बोके,न.प.ऊपाध्यक्ष शरद बलंगे ,नगरसेवक सचिन जायदे, कृष्णा गोमाशे, भुपेंद्र भेलांडे,गणेश पींगे,पंकज राठी, संजय धारस्कर,देवानंद माकोडे,निलेश तायडे, मनोहर मूरकूटे,प्रविण ऊमक,कपील देशमूख,घनश्याम हजारे, गिरीश लोकरे,केशवचद्र कळमकर यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply