News

राफेल प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी: राम

11Views

मुंबई: –

राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपला घेरलं असतानाच, राफेल प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी येते, असं मत ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांनी व्यक्त केलं. ‘मुंबई कलेक्टिव्ह’मधील ‘राफेल: मोदी नेमेसिस’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.

मुंबईतील नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रविवारी झालेल्या परिसंवादात एन. राम यांनी राफेल प्रकरण आणि भ्रष्टाचार यावर मते मांडली. आपल्या देशात सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचार बोकाळला आहे. पण आपल्या देशाचे संरक्षण खाते त्यात आघाडीवर आहे. राफेल लढाऊ विमान खरेदीतील संशयास्पद व्यवहारांवरून हे अधोरेखित होते, असं ते म्हणाले. राफेल लढाऊ विमानं खरेदीवेळी फ्रान्समधील ‘दसॉल्ट’ या कंपनीशी करार करताना समांतर वाटाघाटी करण्यात आल्या. करारातील भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदी मुद्दामहून काढण्यात आल्या. राफेलमध्ये सरकारचा व्यवहार एका खासगी कंपनीशी करण्यात येत होता; असं असताना भ्रष्टाचार प्रतिबंधक तरतुदी काढण्याचे कारण काय? यांसह अशा अनेक बाबींमुळं राफेल विमान खरेदी प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी येते, असं राम म्हणाले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply