nagpurruralNews

रामटेक तालुक्यातील सोनपुर ( पिंडकापार ) शिवारात विज पडुन दोन तरुणाचा मृत्यु

116Views

रामटेक :- हर्ष कनोजे ( प्रतिनिधी )

रामटेक वरुन चार कि.मी. अंतरावर सायंकाळी पाच वाचताच्या सुमारास परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे हे दोघेही युवक खिंडशी सुर नदीला मासोळी पकडण्याकरीता गेले असलेले हर्षल काशीनाथ चनेकर वय१७ वर्षे नागेश हंसराज मोहुर्ले वय १८ वर्षे दोघेही रा. सोनपुर (पिंडकेपार ) असतांनी त्यांच्यावर विज पडल्याने जागीच मृत्यु झाला.दोघेही अाता झालेल्या १२ च्या परिक्षेत पास झाले होते.सदर घटनेची माहीती उपविभागीय अधिकारी राम जोशी यांना मिळताच त्यांनी अधिकांर्‍याना पाठविले.

दोघेही पिंडकापार(सोनपुर)तालुका रामटेक येथील राहीवासी आहेत.घटना साधारण साडेचार वाजताच्या सुमारास घडली.हे दोघेही आपल्या अन्य मीत्रांसह खिंडसी(रामसागर) येथे मासोळ्या पकडण्यासाठी गेले होते.काल रात्रीपासुन संततधार पाऊस पडत होता.आज दुपारी 3 वाजता पावसाने तासभराची विश्रांती घेतल्यानंतर 4 वाजेच्या सुमारास पुन्हा आभाळ दाटून आले व जोराचा पाऊस सुरु झाला.आणी आकाशात जोरदार विज कडाडली.विजेच्या तिव्र धक्क्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

त्यांचे पार्थिव रामटेकच्या ऊपजिल्हा रूग्णालयात पाठवण्यांत आले आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply