News

रामटेक, पारशिवनी, कन्हानच्या पाणीपुरवठा उपाययोजना तातडीने करा – पालकमंत्री

कामचुकार अधिकार्यांवर कडक कारवाई करणार

9Views

रामटेक:-

तालुका प्रतिनिधी:-ललित कनोजे

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना,राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून रामटेक, पारशिवनी व कन्हान तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची तातडीने तातडीने अंमलबजावणी करून नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित यंत्रणांना आज दिले.
ते स्व. घनश्यामराव किंमतकर सभागृहात दि.29 डिसेंबर 2019 ला आयोजित रामटेक महसूल उपविभागातील पाणीटंचाई सदृश्य आराखडा आढावा बैठकीत बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर खासदार कृपाल तुमाने, आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, खनिकर्म विभागाचे अध्यक्ष अँड. आशिष जयस्वाल, रामटेकचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख, पारशिवणीच्या नगराध्यक्षा श्रीमती प्रतिभा कुंभलकर, कन्हानचे नगराध्यक्ष शंकर चंहादे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, पारशिवणी पंचायत समिती सभापती राजेश कडू, रामटेक पंचायत समिती सभापती किरण धुर्वे, माजी आमदार आनंदराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदा कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाणीटंचाईसदृश्य परिस्थिती असून, अधिका-यांनी वेळीच उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यातील एकही नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये. नागरिकांना पाण्यासाठी त्रास होता कामा नये. ज्या पाणीपुरवठा योजनांची प्रशासकीय अथवा इतर मंजुरी मिळण्यात काही अडचणी असतील त्यांचे लेखी प्रस्ताव तात्काळ पाठवावेत. वेळेत कामे पूर्ण न करणा-या अधिका-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम याअंतर्गंत कोणत्याही योजनांमधून नागरिकांना पाणीपुरवठा करा. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिका-यांनीही लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. संबंधित विभागाचे अधिकारी कामे करत नसतील तर उप विभागीय अधिकारी यांनी पिण्याच्या पाणीटंचाईसदृश्य गावांचे दौरे करावेत. कोणत्याही गावांची पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होता कामा नये. महावितरणने जिल्ह्यातील एकाही गावातील पाणीपुरवठा करणा-या वीजपंपांची जोडणी न तोडण्याचे निर्देश देत, वेळप्रसंगी थकीत वीजदेयकांवरील दंड व व्याजांची रक्कम माफ करून टप्प्याटप्प्याने देयके भरण्यासाठी वेळ दिला जाईल, असेही त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना सांगितले.
मार्च २०१९ पर्यंत पाणीटंचाईवरील उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यास सांगून पालकमंत्री बावनकुळे यांनी या कामांना प्राधान्य देत वेगाने कामे करा. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.रामटेक पाणीपुरवठा जलवाहिनी सतत फुटत असल्याच्या तक्रारींवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेकडे सोपवून तातडीने मार्गी लावावी. त्यामध्ये उप विभागीय अधिकारी यांनी सतत पाठपुरावा करून तत्काळ कामे पूर्णत्वास न्यावीत. त्याची महिनाभरात वेळोवेळी माहिती द्यावी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत मंजूर निधी परत जाता कामा नये, याची खबरदारी घेण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
खनिज विकास निधी अंतर्गत करावयाची कामे, आरोग्य देखभाल दुरुस्ती, कालभैरव तीर्थक्षेत्र विकास निधी, स्थानिक आमदार विकास निधीतून कुंवारा भिवसेन, आदिवासी क्षेत्रातील अतिसंवेदनशील गावात दुहेरी पंप आधारित योजनेअंतर्गत तसेच ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी वेगाने कामे करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच वन विभाग, जलसंधारण विभागासोबत यासंदर्भात लवकरच बैठकही घेण्यात येणार आहे.
रामटेक नगरपालिका हद्दीतील विनोबा भावे व डॉक्टर आंबेडकर या वॉर्डात पाण्याची समस्या असून आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च करूनही या भागात पाणी पुरवठ्याची सोय पूर्ण होऊ शकली नाही असा विषय उपस्थित नगराध्यक्ष दिलीप देशमुख व अन्य नगरसेवकांनी सभेत उपस्थित केला याबद्दल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केलेल्या कामाचा दर्जा कारणीभूत असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे यावेळी दिसून आले रामटेक नगरपालिकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले रामटेक मुख्यालयात राहत नाहीत तसेच त्यांच्याविरुद्ध अनेक नगरसेवकांच्या तक्रारी असल्याने पालकमंत्र्यांनी या सभेत त्यांचे कान टोचले नगरविकास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून फेरीवाले यांची तक्रार केली तुम्हालाच काम करावयाचे नाही तर तुम्ही इथून चालते व्हा अशा प्रकारची त्यांनी यावेळी दिली उपस्थित असलेले मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनीही मंत्रीमहोदयांना आपल्या अडचणी सांगत आपण सातत्याने कुठल्याही सभेत मला टार्गेट करीत असता अशा शब्दात प्रत्युत्तर दिले

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply