News

राष्ट्रवादीची भाजपला नगरमध्ये साथ…त्याचे काय पडणार प्रतिसाद?

19Views

नगर :-

महापालिकेतील आज झालेल्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीच्या मदतीने महापौर व उपमहापौर निवडणुकीत विजय मिळवला. भाजपच्या बाबासाहेब वाकळे यांनी या चुरशीच्या निवडणुकीत बाजी मारली! उपमहापौरपदी भाजपच्याच मालन ढोणे यांना संधी मिळाली.राष्ट्रवादीतर्फे गटनेता संपत बारस्कर यांनी तर शिवसेनेकडून बाळासाहेब बोराटे यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केले होते. तर उपमहापौरपदासाठी सेनेकडून गणेश कवडे तर काँग्रेसकडून रूपाली वारे यांचा अर्ज होता. वारे यांनी अर्ज मागे घेतला.

सभागृहात गेल्यावर काँग्रेसने जातीयवादी पक्षासोबत न जाण्याचा निर्णय घेऊन बहिष्कार घातला. छिंदमने शिवसेनेला मतदान केले म्हणून त्याला मारहाण झाली आणि प्रक्रियेवर बहिष्कार घातला. एका खासदार आणि आमदाराने सांगितल्याने छिंदमने ही चाल केल्याचा आरोप शिवसेनेने केला. शिवसेना गटनेत्या रोहिणी शेंडगे यांनी छिंदमचे मत ग्राह्य धरले जाऊ नये असे पत्र दिले होते. मात्र प्रशासनाने ते ग्राह्य धरले नाही.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले. युतीतील शिवसेनेला भाजपने दूर ठेवले. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी भाजपला मदत करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याचे परिणाम राज्यात दिसण्याची शक्यता आहे. शिवसेनेला दूर ठेवून भाजपने सेनेची नाराजी आणखी ओढवून घेतल्याची चर्चा आहे. सेना सातत्याने भाजपवर सध्या टीका करत आहे. त्यात या मुद्याची आणखी भर पडली आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply