nagpurruralNews

राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जल्लोषात स्वागत.

13Views

दिलीप गजभिये
खापरखेडा: रिपोर्टर
खापरखेडा येथील महाराष्ट्र विद्यालयातील 2018-19 या सत्रात विविध क्रीडा स्पर्धेत 121 राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन व्हावे या अनशंगाने मंगळवारी दुपारच्या सुमारास मुख्य मार्गाने शाळेपासून ते अन्नामोड आणि वापस शाळेपर्यंत ढोल, ताशाच्या गजरात भव्य मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान खेळाडूंसोबत विद्यालयाचे मुख्याध्यापक एल.आर. राठोड , उपमुख्याध्यापक सि.आर लिखार, पर्यवेक्षक विजय चांदुरकर, पद्मा वंजाळ, क्रीडाशिक्षक धैर्यशील सुटे , धर्मेंद्र सुर्यवंशी, सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक सुद्धा मिरवणुकीत सहभागी झाले होते.त्याचप्रमाणे चिचोली ग्रामपंचायत चे सरपंच पुरुषोत्तम चांदेकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक झिंगरे, ग्रामपंचायत सदस्या नीता जालंधर, गंगाधर पाटील, अनिल तंभाके , मो. फिरोज अली यासह खापरखेडा पत्रकार संघटना,व विविध सामाजिक संघटनांनी ठिक ठिकाणी पुष्पहार , पुष्पगुच्छ देऊन फटाके फोडत खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले .या मिरवणुकीदरम्यान कार्यक्रमात एक आगळ्या वेगळ्या पध्दतीने नवीन वर्षाचे स्वागतही करण्यात आले.यावेळी सर्वत्र गुणी खेळाडूं व क्रीडा मार्गदर्शकांचे कौतुक व सत्कार करण्यात येत होता.मिरवणूकीत विद्यार्थी, शिक्षक,पालक,ग्रामस्थ हजारोच्या संख्येत उपस्थित होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply