News

रिलायन्स जिओनं आणला पहिला स्वदेशी ब्राऊझर

33Views

नवी दिल्ली : –

Reliance जिओने पहिला भारतीय वेब ब्राऊझर लाँच केला आहे. हा ब्राऊझर भारतीय ग्राहकांच्या गरजा ध्यानात घेऊन तयार करण्यात आला आहे असं कंपनीने म्हटलं आहे. इतर ब्राऊझर्सच्या तुलनेत हा अतिशय वेगवान आणि हलका आहे. या सोबतच जिओब्राऊझर वापरण्यासाठी अतिशय सोपा आहे आणि योग्य रितीने काम करण्यासाठी याला अधिक मेमरी स्टोरेजचीही आवश्यकताही नाही. सध्या हा ब्राऊझर अँड्रॉइड वापरकर्त्यांनाच वापरता येणार आहे आणि आता हा गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येणार आहे.

या ब्राऊझरसोबतच जिओ आपल्या ग्राहकांसाठी चांगले फीचर्सही उपलब्ध करुन देत आहे. नवीन जिओ ब्राऊझरवर काही विशेष माहितीपर व्हिडिओ आणि ताज्या बातम्यांचा खजिना उपलब्ध होणार आहे असं कंपनीने म्हटलं आहे. जिओ ब्राऊझर ८ भारतीय भाषांना सपोर्ट करणार आहे. ज्यात मराठी,हिंदी, गुजराती, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली भाषांचा समावेश आहे. यासोबतच यात एक स्थानिक बातम्यांचा विभागही असणार आहे ज्यामुळे ग्राहकांना आपल्या आसपासच्या भागातील घटना-घडामोडींचा आस्वाद घेता येता आहे.

याशिवाय ग्राहकांना जिओ ब्राऊझरच्या हिस्ट्री पेजवर जाऊन आपल्या डाऊनलोड फाइल्सचे नियंत्रण करता येणार आहे. अलीकडेच लाँच झालेल्या रिलायन्स जिओ ब्राऊझरबाबत कंपनी ग्राहकांकडून अभिप्रायही मागवत आहे. ग्राहकांच्या गरजांना प्राधान्य देताना जिओ ब्राऊझरमध्ये वारंवार सुधारणा करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply