News

रोहित शेट्टीच्या चित्रपटात होणार ‘लेडी सिंघम’ची एन्ट्री!

10Views

मुंबई: –

दमदार अॅक्शन आणि जबरदस्त ड्रामा असलेल्या ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ नंतर पोलिसांच्या आयुष्यावर आधारित आणखी एका चित्रपटासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी सज्ज झालाय. परंतु, त्याच्या या चित्रपटात पुरुष नाही तर महिला पोलीस अधिकारी केंद्रस्थानी असणार आहे.

नव्या चित्रपटासाठी सुचलेल्या या कथेवर सध्या रोहित काम करत आहे. तसेच, या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करणंदेखील सुरू झालंय. या चित्रपटातील मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण असेल हे मात्र अद्याप ठरवण्यात आलेलं नाही. परंतु, स्क्रिप्टचे काम पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या भूमिकांसाठी कलाकारांचा शोध सुरू होईल अशी चर्चा आहे.

रोहित शेट्टी सध्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. ‘सूर्यवंशी’च्या निमित्तानं अभिनेता अक्षय कुमार आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. या चित्रपटात बॉलिवूडचा खिलाडी कुमार एटीएस ऑफिसरची भूमिका साकारतोय.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply