News

रोहित सिडनी टेस्टमध्ये खेळणार नाही!

22Views

मुंबई: 

मेलबर्न कसोटीत अर्धशतक ठोकून भारताच्या विजयात खारीचा वाटा उचलणारा रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरच्या सिडनी कसोटीत खेळणार नाही. रोहितला कन्यारत्न झालं असून, तो मुंबईला रवाना झाला आहे.

भारतीय संघातील ‘हिटमॅन’ रोहित बाबा झाला आहे. पत्नी रितिकानं मुलीला जन्म दिला आहे. रोहित तातडीनं मुंबईला रवाना झाला आहे. ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सिडनी कसोटीत तो खेळू शकणार नाही. त्याच्या जागी अष्टपैलू हार्दिक पंड्याला खेळवण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकदिवसीय मालिकेसाठी तो ऑस्ट्रेलियात परतणार आहे, अशी माहिती बीसीसीआयनं ट्विटद्वारे दिली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply